आभा कार्ड आणि आयुष्मान भारत कार्ड हे नाव तुम्ही अनेकदा ऐकलं असेल. ही दोन्ही कार्डे भारत सरकारच्या ‘आयुष्मान भारत’ कार्यक्रमाचा भाग आहेत, परंतु त्यांचे उद्देश आणि फायदे पूर्णपणे भिन्न आहेत. माझ्या महाराष्ट्रातील बांधवांना या दोन कार्डांमधील नेमका फरक सोप्या भाषेत कळावा म्हणून हा लेख लिहिला आहे.
या दोन कार्डांची तुलना आरोग्य सेवेसाठी दोन भिन्न, परंतु महत्त्वपूर्ण साधनांशी केली जाऊ शकते. एक म्हणजे डिजिटल हेल्थ आयडेंटिटी कार्ड (ABHA) आणि दुसरे म्हणजे मोफत उपचाराची हमी! (आयुष्मान)
आभा कार्ड (ABHA कार्ड) म्हणजे काय?
आभा कार्ड म्हणजे आयुष्मान भारत आरोग्य खाते. हे सुरुवातीला हेल्थ आयडी कार्ड म्हणून ओळखले जात असे.
हे एक डिजिटल ओळखपत्र आहे आणि सरकारकडून त्याला 14 अंकी क्रमांक दिला जातो. आभा कार्डद्वारे, तुमच्या आरोग्याच्या नोंदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत डिजिटल स्वरूपात संग्रहित केल्या जातात.
🔹 उद्देश : तुमच्या हॉस्पिटलमधील जन्मापासून मृत्यूपर्यंतची सर्व वैद्यकीय माहिती डिजिटल पद्धतीने एकाच ठिकाणी साठवा.
🔹फायदा : तुम्ही महाराष्ट्रात किंवा इतरत्र कोणत्याही ठिकाणी गेल्यावर हे कार्ड उपयोगी पडेल, तुमच्या आभा कार्डद्वारे डॉक्टर तुमची जुनी औषधे, चाचणी अहवाल, केलेले उपचार आणि तुमच्या संमतीने त्वरित निदान पाहू शकतात. त्यामुळे उपचारात सातत्य राखले जाते आणि कागदपत्रे जपण्याची गरज नसते
🔹पात्रता : प्रत्येक भारतीय नागरिक हे कार्ड बनवू शकतो. यासाठी कोणतेही उत्पन्न किंवा अन्य अट नाही.
आयुष्मान भारत कार्ड म्हणजे काय?
आयुष्मान भारत कार्ड म्हणजे प्रधान मंत्री जन आरोग्य योजना (PM-JAY), ज्याला ‘गोल्डन कार्ड’ असेही म्हणतात. हा जगातील सर्वात मोठा सरकारी आरोग्य विमा उपक्रम आहे जो राज्य सरकार स्वतः राबवत आहे. दारिद्र्यरेषेखालील नागरिकांना योग्य आरोग्य सेवा प्रदान करणे हा त्याचा मुख्य उद्देश आहे.
या योजनेद्वारे प्रति कुटुंब प्रति वर्ष 5 लाखांपर्यंतचे आरोग्य विमा संरक्षण दिले जाते. याचा अर्थ असा की सरकारने ठरवलेल्या विविध शस्त्रक्रिया आणि इतर आरोग्यविषयक बाबींसाठी 5 लाखांपर्यंतची आर्थिक मदत दिली जाते. त्यासाठी सरकारने काही रुग्णालयांची यादी तयार केली आहे.
🔹उद्देश : हे कार्ड प्रति कुटुंब प्रति वर्ष 5 लाख रुपयांपर्यंत मोफत आरोग्य विमा संरक्षण देते. यामुळे गरीब नागरिक आरोग्य उपचारापासून वंचित राहणार नाहीत.
🔹पात्रता : महाराष्ट्रातील सर्व शिधापत्रिकाधारकांना या योजनेचा लाभ दिला जाईल. ज्यामध्ये पिवळे रेशनकार्ड, केशरी रेशनकार्ड आणि पांढऱ्या रेशनकार्डचाही समावेश असेल.
🔹विविध रोगांसह : योजनेत हॉस्पिटलायझेशनचा खर्च, चाचण्या, औषधे, शस्त्रक्रिया, दाखल होण्यापूर्वी 3 दिवस आणि प्रवेशानंतर 15 दिवसांचा खर्च समाविष्ट असेल.
तुम्ही आयुष्मान भारत योजनेचे लाभार्थी असाल तर तुम्ही तुमचे आयुष्मान कार्ड आणि आभा कार्ड लिंक करू शकता. अशा प्रकारे तुम्हाला उपचारादरम्यान हॉस्पिटलमध्ये कागदपत्रे दाखवण्याची किंवा घेऊन जाण्याची गरज नाही. कारण तुमचे सर्व वैद्यकीय तपशील आभा आयडीद्वारे त्वरित उपलब्ध होतील
जर तुम्ही आयुष्मान भारत योजना कार्ड घेतले नसेल, तर तुम्ही ABHA कार्ड घेऊ शकता आणि तुमचे सर्व वैद्यकीय रेकॉर्ड डिजिटल पद्धतीने आभा कार्डमध्ये संग्रहित करू शकता.

 
															



